20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeमहाराष्ट्रजितेंद्र आव्हाड यांची महिला आयोगाने चौकशी करावी

जितेंद्र आव्हाड यांची महिला आयोगाने चौकशी करावी

एकमत ऑनलाईन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार महिलेने केली. आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार देणा-या पीडित महिलेने आज मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेत आव्हाडांनी जाणूनबुजून ते कृत्य केले असल्याचा आरोप केला.

पीडित तक्रारदार महिलेने पत्रकार परिषदेत सांगितले की, रविवारी, मुंब्रा येथील उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी मला देखील निमंत्रण होते. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी प्रचंड गर्दी होती. मी मुख्यमंर्त्यांना भेटायला गेले. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी तू इथे काय करतेस म्हणत मला बाजूला ढकललं. त्यांनी ढकलल्याने तिथं उपस्थित असलेल्या पुरुषांच्या अंगावर गेले. या प्रकारानंतर मुख्यमंत्री तोपर्यंत निघून गेले होते. त्यांची भेट झाली नाही. मात्र, मी पोलीस ठाण्यात गेले आणि तक्रार दाखल केली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या