22.7 C
Latur
Wednesday, August 12, 2020
Home महाराष्ट्र जो डर गया....सो मर गया.... पहा तुफान व्हायरल व्हिडिओ

जो डर गया….सो मर गया…. पहा तुफान व्हायरल व्हिडिओ

एकमत ऑनलाईन

मुंबई : आपल्याला माहीत आहे साळींदर हे खूप काटेरी असतं. या साळींदराची शिकार करने तसे अवघडच असते. पण ती बिबट्यासाठी अवघड असते ही गोष्ट कोणाला माहिती नाही. गब्बर सिंग ये कहकर गया…जो डर गया सो मर गया…असे म्हटले जाते….असाच एक प्रकार नुकताच पहायला मिळाला. हा व्हिडिओ सर्वत्र पाहिला जातोय. एखादी व्यक्ती लहान आहे म्हणून त्याला दडपण्याचा जो प्रयत्न होतो तो अगदी हाणून पाडल्याचा हा किस्सा आहे.

एवढासा जीव असणा-या साळींदराची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याच्या पिल्ला या साळींदरानं चांगलाच धडा शिकवला. आपल्याला माहीत आहे साळींदर हे खूप काटेरी असतं. या साळींदराची शिकार तर दूरच पण उभं राहण्याची बिशाद ती काय? नुसतं काटे टोचतील इतके काटे या साळींदराच्या अंगावर पाहून आपल्यालाच शहारे येतात. तिथे मात्र शिकारीचे नवे डावपेच शिकलेल्या बिबट्याच्या पिल्लानं त्याची शिकार करण्याचं धाडस केलं आणि फसला.

बिबट्या अंदाज घेऊन वार करत असतानाच साळींदरानं एक जोरात आपल्या काट्यांनी फाइट दिली आणि बिबट्याची पाऊल मागे गेली मात्र त्यानं शिकारीचे प्रयत्न सोडले नाहीत. साळींदरानंही आपल्या बचावाची सगळी हत्यारं वापरली मग काय दोघांमध्ये लढाई सुरू झाली. साळींदर आपला जीव वाचवण्यासाठी आणि बिबट्या शिकार करण्यासाठी लढत एकमेकांशी लढत होते.

बिबट्या या आणि साळींदराच्या या लढाईचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. प्रत्येक सजीव व्यक्तीकडे आपलं संरक्षण करण्यासाठी एक विशिष्ट तंत्र असतं आणि त्याचा योग्य वापर करण्याचं हे उत्तम उदाहरण आहे अस हा व्हिडिओ पाहून सांगितल जातं.

Read More  दुधाच्या दरवाढीकरिता मनसेचे अनोखे आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,143FansLike
101FollowersFollow