26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रज्योतिरादित्य शिंदेंनी दिला पुण्यातील आठवणींना दिला उजाळा

ज्योतिरादित्य शिंदेंनी दिला पुण्यातील आठवणींना दिला उजाळा

एकमत ऑनलाईन

पुणे : केंद्रीय उड्डयन मंत्री आणि भाजपचे नेते ज्योतिरादित्य शिंदे सध्या पुणे दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी पुण्यातील जनतेशी संवाद साधला. विशेष म्हणजे शिंदे यांनी मराठीतून भाषण करत लहानपणीच्या पुण्यातील आठवणींना उजाळा दिला. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, पुण्याशी माझा जवळून संबंध आहे. या शहरातील माझ्या खूप आठणी आहे. महादजी महाराजांच्या छत्री येथे दर्शन करायला, पदमविलास महल तसेच मांजरी फार्म आमचे होते. हॉर्स रेसिंगसाठी दर शनिवारी आणि रविवारी आई-वडिलांसोबत यायचो. त्यावेळी हा आमचा दर शनिवार, रविवारचा कार्यक्रम असायचा, या आठवणी आहे. पुण्याची एक वेगळी जवळीक आहे. मी विश्वास देतो की, तुम्ही जेव्हा सेवा करण्याची संधी द्याल तेव्हा मी सेवा करणारच असेही शिंदे यांनी नमूद केले.

महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यातच आज पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री महेंद्रनाथ पांडे आहे. त्यामुळे आज पुण्यात राजकीय नेत्यांची मादिळायी पाहायला मिळाली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या