32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeमहाराष्ट्रकंगनाच्या याचिकेवरील सुनावणी आता २२ सप्टेंबरला

कंगनाच्या याचिकेवरील सुनावणी आता २२ सप्टेंबरला

एकमत ऑनलाईन

मुंबई – अभिनेत्री कंगना राणौतच्या कार्यालयात मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईला काल मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली होती. या प्रकरणी कंगनानं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने पालिकेला दिले होते. त्यामुळे कंगनाला काल काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आज अभिनेत्री कंगनाच्या कार्यालयावर पालिकेने केलेल्या कारवाईविरोधात दाखल याचिकेवरील सुनावणी हायकोर्टाने २२ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी ही याचिका दाखल केली आहे.

कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयालर पालिकेनं काल सकाळी कारवाई सुरू केली. अवैध बांधकाम प्रकरणी बजावण्यात आलेल्या नोटिशीला २४ तास उलटून गेल्यानं पालिकेकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली. कंगनाच्या वकिलांकडून कारवाईला आक्षेप घेण्यात आला. पालिकेची कारवाई चुकीची असल्याचं म्हणत त्यांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर झालेल्या सुनावणीत कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते.

राज्यात दिवसभरात 23 हजार 816 नव्या कोरोना बाधितांची नोंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या