मुंबई: अभिनेत्री कंगना रणौत नेहमी आपल्या वादग्रस्त ट्विट्ने चर्चेत असते. काही दिवसापूर्वी कंगनाने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या वृद्ध महिलेबाबत ट्विट केले होते. ‘ही १०० रूपयात उपलब्ध होणारी बाई आहे. शाहीन बागमध्येही हीच महिला होती आणि आता शेतकरी आंदोलनातही तिच आहे. कंगनाच्या या ट्विटमुळे कंगना बरीच ट्रोल झाली होती त्यानंतर कंगनाकडून हे ट्विट डिलीट करण्यात आले होते.
दरम्यान, याच मुद्द्यावरून अभिनेता व गायक दिलजीत दोसांजने कंगनाला सुनावले. दिलजीतवर पलटवार करताना कंगनाने सर्व मर्यादा ओलाडल्या होत्या. आता आपल्यावर टीका करणाऱ्यांना कंगनाने निशाणा साधणारे ट्विट कले आहे. कंगनाने लिहिले की, तुम्ही काय म्हणता? या देशातील सध्या मी हॉटेस्ट टार्गेट आहे. माझ्यावर निशाणा साधा आणि मीडियाचे लाडके व्हा. तुम्हाला मूव्ही माफिया द्वारे रोल ऑफर केले जातील. चित्रपटात तुम्हाला काम दिले जाईल.
फिल्मफेअर अवॉर्ड तुम्हाला मिळणार आणि शिवसेनेचे तिकीटही मिळणार. मी जर डॉन असती तर तुम्हाला माहीत आहेच. ७२ देशांचे पोलीस माझ्या मार्गावर असते. असे ट्विट कंगनाने केले आहे
दिलीप कुमार थकले, त्यांच्यासाठी प्रार्थना करा’ : सायरा बानो