नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला ‘अखंड भारत’ या संकल्पनेवर पूर्ण विश्वास असून एक दिवस कराचीदेखील भारतात असेल’ असे म्हटले आहे. मुंबईतील एका ‘कराची स्वीट्स’ नावाच्या दुकानावरून सुरु असलेल्या वादावर ते बोलत होते.
मुंबईत ‘कराची स्वीट्स’ नावाची बेकरी असून या नावाला शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर वाद निर्माण झाला होता. कराची बेकरी आणि कराची स्वीट्स ६० वर्षांपासून मुंबईसह देशात आहेत. त्यांचा पाकिस्तानशी संबध नाही. निर्वासित सिंधी -पंजाबी बांधवांनी कष्टातून उभा केलेला हा व्यवसाय आहे.
कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही’, असे ट्विट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी करुन वादावर पडदा घालण्याचा प्रयत्न केला होता. या भुमिकेवरुन फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी कराचीही अखंड भारतात येईल असे विधान केले. अखंड भारताबद्दल भाजपचे नेते राम माधव, माजी उप-पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी तसेच इंद्रेश कुमार यांनीदेखील वेळोवेळी मतप्रदर्शन केले होते.
वारकऱ्यांना वारी नाही तर उपमुख्यमंत्र्यांनीही वारी करू नये; वारकरी संप्रदायाची भूमिका