31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeमहाराष्ट्रकराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द; रिझर्व्ह बँकेची कारवाई

कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द; रिझर्व्ह बँकेची कारवाई

एकमत ऑनलाईन

सातारा : गेल्या काही दिवसात रिझर्व्ह बँकेने अनेक बँकांना विविध कारणांनी झटका दिला आहे. आता कराड जनता सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे. सहकार क्षेत्रात नावाजलेली कराड जनता सहकारी बँकेवर झालेल्या या कारवाईमुळे बँकिंग क्षेत्रात गोंधळ उडाला आहे.

या बँकेच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे २९ शाखा व ३२ हजार सभासद आहेत. बँकेवर झालेल्या या कारवाईमुळे अनेकांना सभासदांना झटका बसला आहे. बँकिंग परवाना रद्द झाल्याचे आदेश आज प्राप्त झाले. रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यानंतर सहकार आयुक्तांनी बँकेची दिवाळखोरी जाहीर करत बँक अवसायनात गेल्याचे जाहीर केले आहे. बँकेवर उपनिबंधक मनोहर माळी यांची अवसायानिक म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आदेशानुसार बँकेत ५ लाखाआतील ठेवीदारांचे पैसे परत केले जाणार आहेत. याला किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. काही दिवसापुंर्वी महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यामधील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई करून बँकेवर निर्बंध घालण्यात आले होते़

केवळ ३० मिनिटात कोरोना चाचणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या