28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeमहाराष्ट्रकर्नाटकने रोखला महाराष्ट्राचा ऑक्सिजन पुरवठा!

कर्नाटकने रोखला महाराष्ट्राचा ऑक्सिजन पुरवठा!

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : केंद्र सरकारकडून अन्य राज्यांमधून ऑक्सिजन पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेसही सुरु करण्यात आली आहे. पण गुरुवार दि़ ६ मे रोजी कर्नाटक सरकारने अचानकपणे सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी होणारा ऑक्सिजन पुरवठा रोखला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या एकीकडे वाढत असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे. केंद्र सरकारकडून राज्याला मिळणारा ५० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा कर्नाटक सरकारने रोखला आहे. कर्नाटकच्या बेल्लारीमधून कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा सुरु होता. पण कर्नाटक सरकारने तो आज बंद केला. सांगली जिल्ह्यातील ऑक्सिजन टँकर आज कर्नाटकमधून रिकामा परतला आहे. सांगली जिल्ह्याला रोजची ४३ टन ऑक्सिजनची सध्या गरज आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

केंद्राने हस्तक्षेप करावा : सतेज पाटील
ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. सध्या तरी यात राजकारण वाटत नाही. मात्र, केंद्राने लवकरात लवकर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी पाटील यांनी केली. त्याचबरोबर कोल्हापूरहून गोव्याला जाणारा ऑक्सिजन थांबवून तो कर्नाटकातून थेट गोव्याला पुरवण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे.

आता अ‍ँटीबॉडी कॉकटेलद्वारे उपचार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या