24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रकरुणा मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

करुणा मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

एकमत ऑनलाईन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा या आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी विधानभवनातील कार्यालयात दाखल झाल्या. पण आजच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्यामागे त्यांनी टायमिंग साधल्याची चर्चा आहे. कारण आजच सभागृहात शिंदे यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला होता.

करुणा शर्मा सोमवारी सायंकाळी विधानभवनात पोहोचल्या. या ठिकाणी त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मधल्या काळात मुख्यत: महाविकास आघाडीचे सरकार असताना करुणा शर्मा यांच्यावर विविध गुन्हे दाखल झाले होते. यासंदर्भातील काही मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांना भेटीसाठी वेळ देण्यात आली होती.

पण करुणा शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे जे टायमिंग साधले आहे ते वेगळ््या पद्धतीचे आहे. कारण धनंजय मुंडेंचा एक विषय वेगळ््या पद्धतीने आज सभागृहात पाहायला मिळाला. त्यानंतर आज करुणा शर्मा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली.

धनंजय मुंडे यांना टोला लगावताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करुणा या शब्दाचा उल्लेख वेगळ््या पद्धतीने केला. त्यानंतर सभागृहात अनेक चर्चा सुरु झाल्या. धनंजय मुंडे यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाय-यांवर सत्ताधा-यांविरोधात वेगळ््या पद्धतीने आंदोलन केले. यामध्ये भाजपच्या मंत्र्यांना कमी महत्वाचे खाते दिल्याबद्दल टोमण्याच्या स्वरुपात सरकारचा निषेध नोंदवला होता.

 

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या