27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeमराठवाडाकरुणा शर्मा जामीन प्रकरणाचा उद्या निकाल

करुणा शर्मा जामीन प्रकरणाचा उद्या निकाल

एकमत ऑनलाईन

बीड : करुणा शर्मा यांच्या प्रकरणावर राज्याचे लक्ष लागले होते. अंबाजोगाई सत्र न्यायालयात आज न्यायमूर्ती एस.एस. सापटनेकर यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी झाली आहे. करुणा शर्मा यांच्या जामीन प्रकरणी निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. उद्या शर्मा यांच्या जामीन अर्जावरील झालेल्या सुनावणीवर निकाल येणार आहे. यावेळी करुणा शर्मा यांनी पुन्हा बीड जिल्ह्यात येऊन अशा प्रकारचा कृत्य करू नये, अशी मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली.

या प्रकरणावर आता न्यायालय न्यायालय उद्या निकाल देणार आहे. त्यामुळे करुणा शर्मा यांचा पुन्हा एकदा कारागृहात मुक्काम वाढला आहे. आज शर्मा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी झाली असून याचा निकाल न्यायालयाने राखीव ठेवला आहे. हा निकाल न्यायालय आज देणार असल्याची माहिती, करुणा शर्मा यांचे वकील अ‍ॅड.जयंत भाराजकर यांनी मीडियाशी बोलताना दिली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या