टोपे यांची माहिती, औरंगाबादमधील रुग्णांचे प्रमाण घटले
औरंगाबाद : कोरोनाच्या काळात अवाजवी बिल आकारणाºया हॉस्पिटल्सवर आमची करडी नजर आहे, असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. जी रुग्णालये अशी बिले आकारत असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. औरंगाबादमध्ये कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण घटले आहे असेही टोपे यांनी सांगितले.
औरंगाबादमध्ये १ लाख चाचण्या झाल्या, ही चांगली बाब आहे. औरंगाबादमध्ये डबलिंग रेट हा १४ वरून २६ दिवसांवर आला आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. तसेच घाटी रुग्णालयात जी काही रिक्त पदे असतील ती भरण्यात यावीत, असेही त्यांनी सांगितले. कोरोनासंदर्भात औरंगाबादची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी राजेश टोपे औरंगाबाद दौºयावर आहेत. घाटी रुग्णालयाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
ठाण्यात हॉस्पिटलची मान्यता रद्द
ठाणे महानगरपालिकेने रुग्णांकडून अवास्तव बील वसूल करणाºया रुग्णालयावर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. घोडबंदर रोडवरील होरिझन प्राईम रुग्णालयावर महापालिका प्रशासनाने कारवाई करत एक महिन्यांसाठी या रुग्णालयाची मान्यता रद्द केली आहे.
Read More बारावी गुणपत्रिकांचे महाविद्यालयातून होणार वितरण