24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रझंडू बाम घेऊन ठेवा...

झंडू बाम घेऊन ठेवा…

एकमत ऑनलाईन

पुणे : शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडने युती करून पुढील निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय काल जाहीर केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी हा निर्णय जाहीर केला. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवर भाजप नेत्यांकडून टीका करण्यात आली होती. संभाजी ब्रिगेडने २०१९ मध्ये ४० जागांवर निवडणूक लढवली होती पण त्यांना कमी मतं मिळाली होती. उद्धव ठाकरेंसोबत कोणताही पक्ष युती करायला तयार नाही.

उद्धव ठाकरेंचा अडीच वर्षांचा अनुभव पाहता त्यांचे तीन पार्टनर सोडून जातील. आता संभाजी ब्रिगेडसोबत युती करून उद्धव ठाकरेंचा आव आणून दाखवण्याचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे, असा टोला बावनकुळे यांनी लगावला होता. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड लोकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवणार आहोत. लक्षात ठेवा झंडू बाम घेऊन ठेवा, असा इशारा संतोष शिंदे यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांना दिला आहे.

संतोष शिंदे यांचा भाजप नेत्यांना इशारा
चंद्रशेखर बावनकुळे यांना पोटशूळ का उठला आहे? संभाजी ब्रिगेडची भीती का वाटते? शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या एका दिवसाच्या युतीचे टेन्शन का घेतले आहे.. गिरीश महाजन तुम्हाला काठीचा आधार वाटतो का? लक्षात ठेवा झंडू बाम घेऊन ठेवा, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड लोकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून भांडू त्यावेळी तुमचा बाजार उठल्याशिवाय राहणार नाही, असे संतोष शिंदे म्हणाले.

संभाजी ब्रिगेडला किती टक्के मतदान पडले, किती डिपॉझिट जप्त झाले हे सांगतात. पहिल्याच निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात बहुमत मिळवण्याची अपेक्षा करता काय? भाजपला महाराष्ट्रात सत्तेत येण्यासाठी किती वर्षे लागली, देशातले सोडून द्या, असे संतोष शिंदे म्हणाले.

संभाजी ब्रिगेडची दहशत का वाटते तुम्हाला.. आम्ही कामाच्या माध्यमातून दहशत निर्माण करू, असे संतोष शिंदे म्हणाले. आम्हाला घाणेरड्या राजकारणात पडायचे नाही. जो भगवा शिवसेनेचा आहे तोच भगवा संभाजी ब्रिगेडचा आहे. झेंडा पण आमचा आहे आणि दांडा पण आमचा आहे. सत्तेत आहात म्हणून सत्तेची मस्ती दाखवू नका, असा इशारा संतोष शिंदे यांनी गिरीश महाजन यांना दिला.

आम्ही नवीन आहोत म्हणजे गाफील आहोत, असे समजू नका. प्रबोधनकार ठाकरे आणि पुरुषोत्तम खेडेकर यांच्या विचारावर वाटचाल करून विधानसभेवर पुन्हा भगवा फडकवू, असे संतोष शिंदे म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या