25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeमहाराष्ट्र'केम छो वरळी' : परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं

‘केम छो वरळी’ : परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं

एकमत ऑनलाईन

एक व्हिडीओ मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला  ट्वीट ; मुंबईत प्रचंड पाऊस : वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये घरात पाणी शिरलं

मुंबई : मुंबईमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे  त्यामुळे मुंबईकरांची झोप उडाली आहे. वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे. त्यामुळे वरळीकरांना नाहक त्रासाला सोमोरे जावं लागत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीट केला आहे. यामध्ये त्यांनी वरळीतली परीस्थिती दाखवली आहे . ‘केम छो वरळी’, असं कॅप्शन संदीप देशपांडे यांनी या व्हिडीओला दिलं आहे. यातून त्यांनी पालिकेच्या कामावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा? – आशिष शेलार

तर मुंबईकरांनी सरकारकडून कुठलीही अपेक्षा ठेवून नये, अशी टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. ‘विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागात पावसाने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले. या हाहाकाराकडे, उद्ध्वस्त शेतक-यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले, ना मदत. त्यामुळे मुंबईकर हो! सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा ?? शांतता राखा! बदल्या, टेंडर वाटप सुरु आहे!’

अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा – संजय निरुपम

काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनीही ट्वीट करत मुंबईकरांना घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईत काल रात्रीपासून पाऊस सुरु आहे. संपूर्ण शहर आणि आजूबाजुच्या परिसरात पाणी साचलं आहे. रेल्वे स्टेशन ते रुग्णालयापर्यंत सर्व पाण्यात आहे. आजही मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कुठलं अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा. घरी राहा, सुरक्षित राहा’, असं ट्वीट संजय निरुपम यांनी केलं आहे.

मुंबईत कोसळधार; ठिकाणी तुंबल पाणी

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परळ, सायन, वांद्रे या भागात पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून पूर्व उपनगरात पावसाचा जोर थोडा कमी आहे. गेले काही दिवस मुंबईत पावसाने विश्रांति घेतली होती. मात्र आज पुन्हा एकदा मुंबईमध्ये मुसळधार पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. दादर, हिंदमाता, सायन, परळ, अंधेरी सबवे सारख्या अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे.

वरळी परिसरातहू मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. वरळीतील चाळींमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे बैठ्या घरात राहणा-या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांच्या घरात गुडघ्यापर्यंत पाणी भरलं आहे. त्यामुळे येथील रहवासी डबे, बादल्या मिळेल साधनाने घरातून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जोपर्यंत पाण्याचा निचरा होणार नाही तोपर्यंत पाणी ओसरणार नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या