मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात समाजमाध्यमांवर हिणकस लिखाण करणारी अभिनेत्री केतकी चितळेला न्यायालयाने झटका दिला आहे. केतकी चितळेने केलेला जामिनाचा अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळला आहे. केतकी चितळेने काही दिवसांपूर्वीच न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जामिनासाठी अर्ज केला होता. अर्ज फेटाळल्याने केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे.