मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला अटक करण्यात आली आहे.
सध्या ती तळोजा कारागृहात आहे. मात्र केतकीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपल्याला झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे म्हणत तिने थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
केतकीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत तिला झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचा दावा तिने केला आहे. १३ मी रोजी केतकीने अॅड. नितीन भावे लिखित आक्षेपार्ह कविता पोस्ट केली होती. त्यानंतर केतकी प्रकाशझोतात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकीला १५ मे रोजी अटक करण्यात आली होती. केतकीच्या फेसबुक पोस्टवरून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.
एवढेच नव्हे तर राजकीय नेत्यांनी देखील याबाबत संताप व्यक्त केला होता. शिवाय केतकी चितळेला आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट डिलीट करण्यास सांगितले होते. मात्र केतकीने फेसबुक पोस्ट डिलीट करण्यास नकार दिला.