23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रपोलिस कोठडीत विनयभंगासह मारहाण : केतकी चितळेचा गंभीर आरोप

पोलिस कोठडीत विनयभंगासह मारहाण : केतकी चितळेचा गंभीर आरोप

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टिपण्णी करणारी अभिनेत्री केतकी चितळे ही अटक होऊन जामीनावर सुटकाही झाली आहे. पण पोलिस कोठडीत आपल्याला अनेक गंभीर गोष्टींचा सामना करावा लागला असा आरोप तिने नुकताच केला आहे. तिने माध्यमांशी बोलताना सांगितले की, आपल्यासोबत मारहाण आणि विनयभंग झाला आहे.

केतकी म्हणाली, तुरुंगात असताना मला मजबूत राहण गरजेचे होते. कारण, एकतर मला बेकायदा पद्धतीने माझ्या घरातून ताब्यात घेण्यात आले. बेकायदापद्धतीने कुठलेही वॉरंट, नोटीस न देता मला तुरुंगात डांबण्यात आले. पण मला माहिती होते की, मी काहीही चुकीचे केलेले नाही त्यामुळे मी या सर्व गोष्टींना सामोर जाणार. पण पोलिस कोठडीदरम्यान, माझा विनयभंग झाला, मला मारहाण झाली. तसेच काही तरुणांनी माझ्या अंगावर विषारी काळा रंग टाकला.

कळंबोली पोलिसांकडून ठाणे पोलिसांकडे सुपूर्द करत असताना हा प्रकार घडला. अशा प्रकारच्या अनेक अत्याचाराच्या घटना माझ्यासोबत घडल्या, अशा प्रकारे भारतात बेकायदा पद्धतीने अत्याचार करण्यात येत असल्याचेही तिने आरोप करताना म्हटले आहे. पण इतके सोसल्यानंतरही मी हसत बाहेर आले कारण मी तुरुंगातून बाहेर आले होते, पण मी केवळ जामिनावर बाहेर आले आहे, हे लक्षात घ्यायला हवे. माझी लढाई अजून संपलेली नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या