24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रखडसेंना ईडीचा धक्का

खडसेंना ईडीचा धक्का

एकमत ऑनलाईन

मुंबई : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावल्याची बातमी ताजी असतानाच ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनाही नोटीस बजावली आहे. ईडीने जप्त केलेली प्रॉपर्टी रिकामी करा, अशी नोटीस खडसेंना बजावण्यात आली आहे. जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने खडसेंची जागा जप्त केली होती. ती जागा रिकामी करण्याची नोटीस ईडीने बजावली.
ईडीकडून एकनाथ खडसे यांची गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ५ कोटी ७५ लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली होती.

यामध्ये जळगाव आणि लोणावळा येथील जागेचा समावेश होता. भोसरी एमआयडीसी जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणी संबंधित कारवाई करण्यात आली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना एकनाथ खडसे हे भाजपमध्ये होते. तसेच ते त्यावेळी महाराष्ट्राचे महसूल मंत्री होते. मंत्री असताना खडसेंनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. विशेष म्हणजे ३१ कोटी रुपये किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७५ कोटी रुपयांमध्ये विक्री झाल्याचा दावा करण्यात आला होता.

रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारभाव दाखवून जमिनीची खरेदी करण्यात आल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. या प्रकरणी खडसे अनेकवेळा अडचणीत आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या