30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रखडसेंचा प्रवेश पवारांची राजकीय गणिते!

खडसेंचा प्रवेश पवारांची राजकीय गणिते!

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देत शरद पवार यांनी भाजपाला मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खडसेंना प्रवेश देण्यामागे शरद पवारांची राजकीय गणिते असू शकतात असा अंदाज वर्तवला आहे. खडसेंची भूमिका मान्य असल्यानेच राष्ट्रवादीने त्यांना प्रवेश दिला असेल असेही ते म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.

मी शरद पवारांचे आधीचे वक्तव्य ऐकले ज्यामध्ये त्यांनी जे सोडून गेले आहेत़ त्यांना परत प्रवेश देणार नाही सांगितले. इतका कठोर निर्णयÞ जर शरद पवार घेऊ शकतात तर त्याच वेळेला भाजपामधील प्रमुख नेत्याला प्रवेश देत आहेत. त्यांची काही राजकीय गणिते असू शकतात, असे राऊत यांनी म्हटले आहे़

शरद पवार राजकारणातील सर्वशक्तीमान नेते
एकनाथ खडसे यांनी मांडलेली भूमिका मी ऐकली. ती भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल म्हणून त्यांनी प्रवेश दिला. शरद पवार राजकारणातील सर्वात ताकदवान नेते असून, त्या पक्षाचे प्रमुख आहेत. ते असे उगाच कोणाला प्रवेश देणार नाहीत. त्यांना त्यांचे महत्त्व पटले असेल.

कोरोना लशीचे भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादनाची शक्यता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या