गडचिरोली : वाघ आणि बिबट्याच्या झुंजीत बिबट्या ठार झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास गडचिरोली शहरापासून जवळच असलेल्या वाकडी येथील आरोग्य केंद्राजवळ असलेल्या जंगलात घडली.
सेमाना-वाकडी परिसरात वाघ आणि बिबट्यांचा संचार असून शनिवारी रात्रीच्या सुमारास वाघ आणि बिबट्याच्या झुंजीत बिबट्या ठार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या झुंजीत वाघदेखील जखमी झाला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला.