मुंबई : माझ्यावर एक हजार कोटींचा मानहानीचा गुन्हा दाखल करू द्या, त्यांना काम काय आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांना लगावला. किरीट सोमय्या हा भ्रष्ट माणूस असल्याचे राऊत म्हणाले. ज्याने देशाच्या संरक्षण व्यवस्थेसंबंधी आयएनएस विक्रांत वाचवा या नावावरून लोकांकडून पैसे गोळा केले आणि ते पैसे जमा केले नाहीत. असा विक्रांत घोटाळा करणारा माणूस ज्याने देशाची मानहानी केली, ज्याने देशाची चोरी केली ते काय मानहानी करणार असेही राऊत यावेळी म्हणाले. अजून त्यांनी काही बघितलं नाही, भविष्यात त्यांना बरेच काही बघायचे असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.
किरीट सोमय्या हे विक्रांत घोटाळ्यातील आरोपी आहेत. जामिनावर ते सुटले आहेत. त्यांच्यावर कोर्टाने अटी आणि शर्थी घातल्या आहेत. देवाने तोंड दिले आहे म्हणून ते काहीही बोलत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. राज्यसभेच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे करतील असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. छत्रपती घराण्याचा मान राखून संभाजीराजेंना प्रस्ताव दिला आहे. पण राज्यसभेचे दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असतील असेही राऊत यावेळी म्हणाले.
राऊतांचा मनसेला टोला
किरीट सोमय्यांना सध्या काय काम आहे. लोकांवर आरोप करायचे, त्यांची बदनामी करायची, ते स्वत: आरोपी असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. त्यांनी देशाबरोबर धोका केला आहे. विक्रांतच्या नावाखाली पैसा गोळा केला आणि जमा केला नसल्याचे राऊत यावेळी म्हणाले. खासदार बृजभूषण सिंह यांना कोण ओळखत नाही. ते खासदार आहेत. पार्लमेंटमध्ये आम्ही बसतो, बोलतो, एकत्र जेवण करतो असेही राऊत म्हणाले. आरोप करणारांनी अभ्यास करावा असे म्हणत राऊतांनी मनसेला देखील टोला लगावला. योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर देखील आम्ही चहापान करतो, मग योगींना आम्ही राज ठाकरेंना अडवण्यासाठी रसद पुरवली का? असेही राऊत यावेळी म्हणाले. हे लोक अभ्यासात कच्चे असल्याचे राऊत म्हणाले.