26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रकिसान रेल्वे पाच महिन्यांपासून बंद

किसान रेल्वे पाच महिन्यांपासून बंद

एकमत ऑनलाईन

नाशिक : देशभरातील शेतक-यांसाठी मोठा गाजावाजा करून सुरू केलेली किसान रेल्वे मागील पाच महिन्यापासून बंद आहे. कोळशाच्या तुटवड्याचे कारण सांगून रेल्वे बंद करण्यात आली आहे. रेल्वे बंद झाल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

शेतक-यांच्या मालाला उठाव मिळावा नवी बाजारपेठ मिळावी या हेतूने रेल्वे मंत्रालयाने ८ ऑगस्ट २०२० देवळाली रेल्वे स्थानकातून पहिली किसान रेल्वे सुरु केली होती. नाशिकसह आजूबाजूच्या गावातील, जिल्ह्यातील शेतक-यांचा शेतीमाल इतर राज्यात कमी खर्चात, कमी वेळात पुरवठा करणारी रेल्वे सुरु झाल्याने आस्मानी सुलतानी संकटाचा सामना करणा-या शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला होता. सुरवातीच्या काळात मिळालेल्या प्रतिसादानंतर आठवड्यातून एक दिवस धावणारी रेल्वे पुढे चार दिवस सुरु करण्याचा निर्णय झाला.

दररोज ५०० टनापेक्षा अधिक मालाची वाहतूक
दिवसाला नभुसावळ विभागातून साधारणत: ५०० टन मालाची वाहतूक केली जात होती. वाहतुकीच्या भाड्यापोटी रेल्वेला २० लाख रुपयाचे भाडेही दररोज मिळत होते. २० महिने शेतकरी व्यापा-यांच्या प्रतिसादामुळे रेल्वे धावत होती मात्र अचानक रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला आणि १३ एप्रिल २०२२ पासून आजपर्यंत शेतमालाची वाहतूक करणारी रेल्वे सेवा ठप्प आहे.

रेल्वे बंद झाल्याने पालेभाज्या, फळे महागली
राज्यातून भाजीपाला, कांदा, द्राक्षे, डाळिंब, संत्रीची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत होती. रस्ता मार्गाने वाहतूक करता किलोमागे १० ते १२ रुपये लागायचे. रेल्वेमुळे तोच खर्च अवघ्या चार रुपयावर आला होता त्यात दोन रुपये अनुदानही मिळत होते. म्हणजे प्रत्यक्षात शेतक-याला किलोमागे दोन रुपये खर्च येत होता. त्यामुळे शेतक-यांसाठी ही रेल्वे वरदान ठरली होती. शेतीमाल नाशवंत असल्याने कमी वेळात कमी खर्चात बाजार पेठ उपलब्ध होत असल्याने शेतक-यांना उत्पन्नात वाढ होत होती.

रेल्वेमंत्री दानवे निरुत्तर
तीन दिवसापूर्वी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नाशिकला आले होते. त्यावेळी नाशिकच्या खासदारांनी किसान रेल्वे सुरु करण्याची मागणी केली. मात्र त्यावर अद्याप काहीच पावले टाकली नाहीत. मुळात कोळसा तुटवडा, कोळसा वाहतूक आणि किसान रेल्वे बंद करण्याचा सबंध तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे. त्याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही त्यामुळे पपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली ही ड्रीम रेल्वे पुन्हा कधी धावणार असा सवाल उपस्थित होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या