32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeमहाराष्ट्रकोल्हापूर : पॅकेजचे पैसे भरल्यावर कोविड रुग्ण दगावल्याचे सांगितले

कोल्हापूर : पॅकेजचे पैसे भरल्यावर कोविड रुग्ण दगावल्याचे सांगितले

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : पॅकेजची उर्वरित 30 हजार रुपयांची रक्कम भरून घेतल्यानंतर 15 ते 20 मिनिटांतच कोविडचा रुग्ण दगवल्याचे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले. यामुळे संतप्त नातेवाईकांनी कोल्हापूरमधील महाराणा प्रताप चौकातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. नातेवाईकांच्या गोंधळासमोर हात टेकलेल्या हाॅस्पिटल प्रशासनाला अखेर पोलिसांना व सामाजिक कार्यकर्त्यांना मध्यस्ती करावयास भाग पाडले.

४ महिन्यांत तब्बल २.५ हजार कोटी बुडाले!

याप्रकरणी घटनास्थळ व नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यादवनगर येथील एका 30 वर्षीय रुग्णाला इतर हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसल्याने तसेच पैसे जास्त सांगितल्याने 27 जुलै रोजी महाराणा प्रताप चौकातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. याठिकाणी दीड लाख रुपयांचे पॅकेज सांगितले गेले. त्यातील एक लाख रुपये नातेवाईकांनी शुक्रवारपर्यंत भरले होते, आज दुपारी आणखी उर्वरित 50 हजार रुपये भरण्यास सांगितले होते. त्यातील 30 हजार भरल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी रुग्ण दगवल्याचे हॉस्पिटलकडून सांगण्यात आल्याने नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले.

त्यामुळे अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले होते. लक्ष्मीपुरी पोलिस तसेच युवासेनेचे पदाधिकारी हर्षल सुर्वे यांनी समजुत काढल्यानंतर नातेवाईक शांत झाले.

नरेंद्र मोदी धार्मिक गटाचे नेते : प्रकाश आंबेडकर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या