Thursday, September 28, 2023

राज्यात कोकण बोर्डच अव्वल

पुणे : दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, यंदा ९३.८३ टक्के निकाल लागला, अशी माहिती एसएससी बोर्डाकडून देण्यात आली. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली. दहावीत ९५.८७ टक्के मुली पास झाल्या, तर मुलांची टक्केवारी ९२.०५ एवढी आहे. विशेष म्हणजे यंदाही कोकण विभागाचाच सर्वाधिक ९८.११ टक्के निकाल लागला असून नागपूर विभागाचा सर्वांत कमी निकाल लागला. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन दहावीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली.

राज्यातील १५ लाख ७९ हजार ३७१ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. यापैकी ४ लाख ८९ हजार ४५५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह पास झाले असून ५ लाख २६ हजार २१० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ३ लाख ३४ हजार १५ विद्यार्थी हे दुस-या श्रेणीत पास झाले आहेत. ८५ हजार २८८ विद्यार्थ्यांचा निकाल उत्तीर्ण श्रेणीत लागला आहे. २३ हजार शाळांमधून जवळपास ६ हजार ८४४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. मात्र, गेल्या ४ वर्षांच्या तुलनेत यंदाचा निकाल घटला आहे.

विभागनिहाय निकाल
छ. संभाजीनगर : ९३.२३ टक्के
कोकण : ९८.११ टक्के
लातूर : ९२.६७ टक्के
मुंबई : ९३.६६ टक्के
पुणे : ९५.६४ टक्के
नागपूर : ९२.०५ टक्के
कोल्हापूर : ९६.७३ टक्के
अमरावती : ९३.२२ टक्के
नाशिक : ९२.२२ टक्के

एकूण १०० टक्के गुण
मिळविणारे १५१ विद्यार्थी
राज्यात १०० टक्के गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांची संख्या १५१ आहे. त्यात लातूर मंडळातील सर्वाधिक १०८, पुणे ५, औरंगाबाद २२, मुंबई ६,अमरावती ७, कोकणातील ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शंभर टक्के निकाल लावताना ग्रेस गुणांचाही विचार करण्यात येतो.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या