34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रकामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन

कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन

एकमत ऑनलाईन

मुंबई : गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे, गिरणी कामगारांना घर मिळावे म्हणून लढा देणारे गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, तीन मुली, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. वरळी येथील स्मशानभूमीत सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते आणि राष्ट्र सेवादल कार्यकर्ते दत्ता इस्वलकर गेली तीन ते चार वर्षांपासून आजारी होते. मेंदूतील रक्ताश्राव गोठल्याने त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शरिराने त्यांना साथ न दिल्याने सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

२ ऑक्टोबर १९८९ रोजी गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर त्यांनी संघर्ष करण्यास सुरुवात केली. त्याच दिवशी गिरणी कामगार संघर्ष समितीची स्थापना केली. ते आजपर्यंत समितीचे अध्यक्ष होते. बंद पडलेल्या १० गिरण्या त्यांच्या नेतृत्वाखाली १९८८ – ९० च्या दशकात सुरु केल्या. त्यानंतर त्यांनी गिरणी कामगारांना स्वेच्छा निवृत्तीपोटी चांगले पैसे मिळवून दिले. गिरण्यांच्या जमिनीवर कामगारांना घरे आणि रोजगार मिळाला पाहिजे म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांचे विराट मोर्चे काढण्यात आले. त्याचा परिणाम आतापर्यंत गिरण्यांच्या जमिनीवर १५ हजार कामगारांना घरे मिळाली. तसेच गिरण्या चाळीतील ७ ते ८ हजार कामगारांना कायमस्वरुपी घरे मिळवून दिली. त्यांच्या निधनाने कामगारा चळवळीतील संघर्ष करणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

राज्यात ३ दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या