27 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home महाराष्ट्र मुंबईच्या पुर्व मुक्त मार्गास स्व. विलासराव देशमुख यांचे नाव द्या - ...

मुंबईच्या पुर्व मुक्त मार्गास स्व. विलासराव देशमुख यांचे नाव द्या – पालकमंत्री अस्लम शेख

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि.२९ (प्रतिनिधी) दक्षिण मुंबईहून थेट मुंबई पूर्व उपनगराला जोडणाऱ्या पुर्व मुक्त मार्गाला (फ्री वे) माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांचे नाव द्यावे, अशी मागणी राज्याचे मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी एका पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबईची वाहतुक कोंडी लक्षात घेता महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी मुंबई शहर आणि मुंबई पूर्व उपनगर यांना जोडणाऱ्या पुर्व मुक्त मार्गाची संकल्पना मांडली होती. त्यांच्या संकल्पनेमुळेच हा मार्ग तयार होऊ शकला. या रस्त्याची लांबी १६.८ कि.मी. असून दक्षिण मुंबईतील ‘पी डीमोलो रोड पासुन ते चेंबुर येथील पुर्व द्रुतगती मार्गास हा मार्ग जोडला गेला आहे.

सध्या हा रस्ता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. या रस्त्यास माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे नाव दिल्यास ती त्यांच्या कार्याची पोहच पावती असेल असे अस्लम शेख यांनी मुख्यंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मागे या मार्गाला स्व. विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी केली होती.

रायगडमध्ये बल्क ड्रग पार्क, तर औरंगाबादला वैद्यकीय उपकरण निर्मिती उद्योग क्षेत्र !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या