मुंबई, दि.१६ : माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे लातूर येथे स्मृतिभवन उभारण्यात येणार असून त्यासाठी लातूर पंचायत समितीच्या सभापतींचे निवासस्थान जिल्हा परिषदेने सांस्कृतिक कार्य विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिल्या. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यावेळी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे लातूर येथे स्मृती भवन तयार करण्यासह दक्षिण मराठवाड्याचे दर्शन घडविणारे प्रादेशिक शासकीय संग्रहालय नव्याने निर्माण करण्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. स्मृतिभवनासाठी लातूर पंचायत समितीच्या सभापतींचे निवासस्थान जिल्हा परिषदेने सांस्कृतिक कार्य विभागाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ग्रामविकास विभागाला पाठविण्यात येईल त्यानंतरच याची कार्यवाही पूर्ण होईल असे ग्रामविकासमंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
दक्षिण मराठवाड्याचे दर्शन घडविणारे प्रादेशिक शासकीय संग्रहालय नव्याने निर्माण करण्याचा सविस्तर आराखडा सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरातत्व संचालनालयामार्फत तयार करण्यात येईल, या आराखड्यात प्रामुख्याने स्व. विलासराव देशमुख यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द दाखविण्याबरोबरच मराठवाड्याचा इतिहास, गौरवगाथा, माराठवड्यातील किल्ले, शिल्पे, पुरातन वास्तू, ऐतिहासिक ठेवा आदींचा समावेश असेल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.
शीतल आमटेंच्या मृत्यूनंतर पती गौतम करजगी मुलासह पुण्याला रवाना