34.3 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeमहाराष्ट्रकोव्हॅक्सिनची नागपुरमध्ये सुरूवात; समाधानकारक परिणाम

कोव्हॅक्सिनची नागपुरमध्ये सुरूवात; समाधानकारक परिणाम

एकमत ऑनलाईन

नागपूर : देशात थैमान घालणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यासोबतच राज्यात देखील कोरोनाने अक्षरश: कहर केला असून या कोरोना विषाणूवर लस काढण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु आहेत. त्यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. भारतात भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोरोनावरील देशातील पहिल्या कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. या लसीची चाचणी ही नागपूरमध्ये करण्यात आली आहे. सोमवारी तीन रुग्णांना ही लस देण्यात आली असून ज्या तिघांना ही लस देण्यात आली त्यांचे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत.

दोन पुरुष आणि एका महिलेला लस देण्यात आली

भारतात तयार करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या मानवी चाचण्यांना नागपूरमधील गिल्लूरकर हॉस्पिटलमधून सुरुवात झाली आहे. या लसीच्या चाचणीच्या पहिल्या टप्पात सोमावारी दोन पुरुष आणि एका महिलेला लस देण्यात आली. त्या लसीचे या व्यक्तींना कोणतेही दुष्परिणाम जाणवले नाहीत. पुढील १४ दिवसापर्यंत यांना कोणतीही लक्षणे किंवा त्रास नसल्यास कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोज दिला जाणार आहे.

या लसीच्या चाचणीसाठी ५० जण स्वत: पुढे आले

नागपूरचे डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसह यामध्ये आणखी चार संस्थाचा समावेश आहे. तसेच कोव्हॅक्सिनला परवानगी देण्यात आल्यानंतर गिल्लूरकर हॉस्पिटलची निवड करण्यात आली होती. त्यानंतर या लसीच्या चाचणीसाठी ५० जण स्वत: पुढे आले. त्यानंतर या सर्वांची तपासणी करुन त्यांच्या रक्ताचे नमुने मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यातील आठ जणांचे नमुने सामन्य आल्यानंतर यातील तिघांना सोमवारी लस देण्यात आली. दरम्यान, या तिघांचेही रिरोप्ट नॉर्मल आले आहेत. ही महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. जर या लसीची चाचणी यशस्वी ठरली तर देशासाठी सर्वात मोठी गोष्ट असणार आहे.

पहिल्या टप्प्यात ३७५ जणांवर तर दुसऱ्या टप्प्यांमध्ये ७५० जणांवर ही चाचणी होणार

पहिल्या टप्प्यात दिल्ली, रोहतांग, हैदराबाद, पाटणा या चार ठिकाणी पहिली चाचणी होईल. त्याचे परिणाम पाहून पुढच्या टप्प्यांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्याचबरोबर कानपूर, गोवा, बेळगाव, चेन्नई, विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर इथल्या सेंटर्सवरही या चाचण्या केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात ३७५ जणांवर तर दुसऱ्या टप्प्यांमध्ये ७५० जणांवर ही चाचणी होणार आहे.

Read More  आठ पॉझिटीव्ह; ‘बाखरवडी’ च्या सेटवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या