23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रनेत्यांचा ‘योगा’त्सव त्र्यंबकेश्वरात

नेत्यांचा ‘योगा’त्सव त्र्यंबकेश्वरात

एकमत ऑनलाईन

त्र्यंबकेश्वर : भारताचे गृह आणि सहकार मंत्री अमित शाह जागतिक योग दिनी म्हणजेच २१ जून रोजी त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या गुरुपीठावर येणार आहेत. अमित शाह यांचे हस्ते विविध उपक्रमांचा शुभारंभ होणार आहे.

जागतिक योग दिन तसेच सद्गुरू मोरेदादा हॉस्पिटल शिलान्यास सोहळा मंत्री महोदय आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्यामुळे आणि महाराष्ट्राचेही अनेक मंत्री, खासदार, आमदार, विविध पक्षांचे पदाधिकारी या सोहळ्यात हजेरी लावणार असल्याने, याबाबत तयारीचा आढावा आज विविध यंत्रणांनी घेतला. पालकमंत्री छगन भुजबळ, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे, खासदार हेमंत गोडसे, आ. राधाकृष्ण विखे पाटील आदी सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या