22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeमहाराष्ट्रविधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक १ डिसेंबरला !

विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक १ डिसेंबरला !

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद, नागपूर, पुणे पदवीधर, व दोन शिक्षक मतदारसंघात निवडणूक मुंबई, दि २(प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकटाची तीव्रता कमी होण्यास सुरवात झाल्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांची निवडणूक जाहीर केली आहे. औरंगाबाद, नागपूर व पुणे पदवीधर, तसेच पुणे व अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या या निवाफणुकीसाठी १ डिसेंबर रोजी तेथे मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी होईल.

निवडणूक आयोगाने राज्यात पाच जागांसाठी निवडणूक जाहीर केली. त्यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ व दोन जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण व नागपूरमधील अनिल सोले यांचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपला तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील हे निवडणूक जिंकून विधानसभेवर गेल्याने पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा रिक्त आहे. तर शिक्षक मतदारसंघाच्या अमरावती विभागातून श्रीकांत देशपांडे आणि पुणे विभागातून दत्तात्रय सावंत याचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपला आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातून अमरावती व पुणे विभागाच्या दोन जागा रिक्त आहे. या पाचही जागांवर एक डिसेंबरला मतदान होईल तर ३ डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे
ऐन दिवाळीच्या सणात निवडणूक प्रक्रीयेला सुरवात होईल. ५ नोव्हेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होईल. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर आहे. १३ नोव्हेंबरला अर्जांची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची तारीख १७ नोव्हेंबर आहे. तीन डिसेंबरला मतमोजणी झाल्यावर ७ डिसेंबरपासून सुरु होणा-या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नवनिर्वाचित सदस्याचा शपथविधी होईल.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमीच !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या