26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणासाठी मंत्रालय जाळून टाकू - अखिल भारतीय मराठा महासंघाचा इशारा

मराठा आरक्षणासाठी मंत्रालय जाळून टाकू – अखिल भारतीय मराठा महासंघाचा इशारा

एकमत ऑनलाईन

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आता विविध संघटना आक्रमक होताना पाहायला मिळत आहे, एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी मराठा संघटनेचा मशाल मोर्चा येणार आहे, तर दुसरीकडे अखिल भारतीय मराठा महासंघाने आरक्षणासाठी अख्खे मंत्रालय जाळून टाकू, असा इशारा दिल्याने खळबळ माजली आहे. याबाबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख म्हणाले की, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोवर शाळा, महाविद्यालय प्रवेशासह नोकर भरती करू नये, सरकारचे धोरण म्हणजे मराठ्यांच्या मुलाचे मरण झाले आहे. मातोश्रीवर आक्रोश मोर्चा, मशाल मोर्चा आहे, आम्ही लाखोंच्या संख्येने शांततेत मोर्चा काढून जगाला आदर्श दिला असे त्यांनी सांगितले.

तसेच सरकार कोणाचेही असो, या नेत्यांनी स्वत:चा भ्रष्टाचार लपवण्यासाठी मंत्रालयातल्या फाईली जाळल्या आहेत, पुरावे नष्ट केले, परंतु मराठा आरक्षणासाठी आता आम्ही सगळे मराठा तरूण अख्खे मंत्रालय जाळून टाकू. मराठ्यांनी तलवारी जोरावर सातासमुद्रापार ताब्यात घेतला आहे़ हा आमचा इतिहास आहे, असा गंभीर इशारा अरविंद देशमुख यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.

मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी ते पंढरपूर शहर पोलिस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर दहा गाड्यांमध्ये मराठा बांधव बसून पुण्यामध्ये जाणार आहेत. त्याठिकाणी मुख्य सचिवांसह मराठा बांधवाच्या पदाधिका-यांची बैठक होणार असल्याचे पदाधिका-याने सांगितले.

पंढरपुरात गर्दी, मोठा पोलिस बंदोबस्त
सध्या कोरोनामुळे या संसर्गजन्य रोगाच्या संकटाचे सावट आहे़ यामुळे पंढरपुरात गर्दी होऊ नये. नागरिकांचे आरोग्य धोक्यात पडू नये. यासाठी मराठा समाजाचा मोर्चा गर्दी करु नये, अशा सूचना पदाधिका-यांना देण्यात आल्या होत्या. तसेच अधिकची सुरक्षा म्हणून पोलिस प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त लावला होता. सकाळी नऊ वाजल्यापासून मराठा समाजाचे पदाधिका-यांनी शिवाजी चौकात जमण्यास सुरुवात केली होती. साडे अकराच्या सुमारास मराठा बांधवांना शासनाचा आदेश जुगारून नामदेव पायरीचे दर्शन घेऊन मोर्चास सुरुवात केली.

चला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे विद्यार्थी होऊया

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या