32 C
Latur
Monday, March 27, 2023
Homeमहाराष्ट्रपराभवाची कारणे शोधून त्याबाबत चिंतन करू

पराभवाची कारणे शोधून त्याबाबत चिंतन करू

एकमत ऑनलाईन

पुणे – राज्यात नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला काही जागा गमवाव्या लागल्या. या पराभवाचे अभ्यास करून चिंतन करू, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना सांगितले. पक्षाच्या बैठकीसाठी ते येथे आले होते.

ते म्हणाले, या निवडणुकीतील ३ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. आम्ही चांगल्या प्रकारे निवडणूक लढविली असे असताना आम्ही हरलो असे चित्र निर्माण करण्यात येत आहे. मात्र निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधून त्याबाबत चिंतन करण्यात येणार आहे. अमरावतीमध्ये आम्ही कमी पडलो असे त्यांनी स्पष्ट केले. कोकण मतदारसंघात आम्ही प्रथमच विजयी झालो तर अमरावतीची आमची जागा हरलो आहोत. आम्ही पाचही जागा जिंकण्याचा प्रयत्न केला इतकेच. सर्व जागा जिंकू असा दावा कधीही केला नाही, असे ते म्हणाले.

नाशिक मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झालेले सत्यजित तांबे यांना आमच्याकडून कोणतीही ऑफर दिली जाणार नाही. त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा. आमच्या पक्षाच्या वतीने त्यांना स्थानिक पातळीवर मदत केली आहे असे त्यांनी सांगितले. कसबा आणि पिंपरी-चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत ते म्हणाले, प्रदेशाने यादी मंजूर करून पक्षनेतृत्वाकडे पाठवली आहे. तेथून अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या