36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रनामांतराबाबत चर्चेतून मार्ग काढू - अजित पवार

नामांतराबाबत चर्चेतून मार्ग काढू – अजित पवार

एकमत ऑनलाईन

मुंबई: औरंगाबादच्या नामांतरावरून वेगवेगळी मते येत आहेत. या मुद्द्यावर मी गेल्या आठवड्यातच बोलले होतो. राज्यात तीन पक्षाचे सरकार असल्याने या विषयावर एकत्र बसून चर्चा करूनच मार्ग काढू असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला आहे. त्याची आम्ही शहानिशा करून त्यामागचे कारण शोधू, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी ही भूमिका व्यक्त केली. राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. आम्ही किमान समान कार्यक्रम ठरवला आहे. तीन पक्षांचे सरकार चालवताना काही वेळेला एखादा विषय निर्माण होत असतो. पण त्यावर चर्चा करून योग्य मार्ग काढता येतो. औरंगाबादच्या नामांतराबाबत तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करतील आणि योग्य तो मार्ग काढतील, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. नेमकं हे का झालं? जाणीवपूर्वक गडबड झाली की अनावधानाने ही गडबड झाली? ही बाब तपासून पाहू. कधी कधी अशा गोष्टी घडत असतात. नक्की काय झाले याची शहानिशा करूनच त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करेन, असे ते म्हणाले.

वंचित बहुजनचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्याला संभाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्याबाबत पवारांना विचारले असता, कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. कुणी भावनिक मुद्दे काढत असतात. कुणी विकासाबद्दल बोलत असतात तर कुणी नामकराणाचे मुद्दे काढत असतात. राज्यात गेल्या ६० वर्षात अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत. कोण औरंगाबादबद्दल बोलतंय, कोण नगरबद्दल तर कोण पुण्याबद्दल बोलतंय. प्रत्येकाला आपली मागणी रेटण्याचा अधिकार आहे, असं सांगतानाच अनेक विमानतळांना महापुरुषांची नावे दिलेली आपण पाहिली आहेत. महाविकास आघाडीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच विकासाला प्राधान्य दिलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही विकासावर भर दिला आहे. आम्हीही याच भूमिकेचं समर्थन करत असतो, असंही ते म्हणाले.

प्रिमियमचा निर्णय विचारपूर्वक
कोरोनाच्या काळात बांधकाम व्यवसाय ठप्प झाला होता. त्यांना उभारी देण्यासाठीच प्रिमियमचा निर्णय घेतला आहे. विरोधक या निर्णयावर जाणीवपूर्वक टीका करत आहेत. दुसरं कोणतंही कारण नाही. मुद्रांक शुल्काबाबतच्या निर्णयावरही विरोधकांनी टीका केली होती. पण त्याचा सर्वांनाच फायदा झाला होता. त्यामुळेच प्रिमियमचा निर्णयही ग्राहकांचे हित लक्षात घेऊनच घेतला आहे, असं ते म्हणाले.

पालिका निवडणुकीत आघाडी व्हावी
मुंबई महापालिका निवडणुकीत मित्र पक्षांसोबत आघाडी करून पुढे जाण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे. शेवटी अंतिम निर्णय शरद पवार घेतली. आघाडी व्हावी. मतांची विभागणी होऊ नये. नाही तर तुला ना मला, घाल तिसºयाला असे होऊ नये. आघाडी बाबत मी सकारात्मक आहे, असं त्यांनी सांगितलं. आघाडीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याशी चर्चा करू. महाविकास आघाडीला कोणताही अडथळा न येता स्थानिक स्वराज्य संस्थेत यश मिळावं हाच आमचा प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले.

शहराचे नाव बदलून सामान्यांच्या आयुष्यात काही बदल होतो का ?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या