22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रचला अयोध्येला...; मनसेकडून बॅनरबाजी

चला अयोध्येला…; मनसेकडून बॅनरबाजी

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनसेचे प्रमुख राज ठाकरे येत्या ५ जूनला अयोध्येला जाणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मनेसेने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मनसेकडून शिवाजी पार्कमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर ‘चला अयोध्येला’असे लिहिण्यात आले आहे.

शिवाजी पार्कच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे. याच पुतळ्यासमोर मनसेने बॅनर लावून राज ठाकरे यांच्यासोबत अयोध्या दौ-यावर येण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यासमोर राज यांच्या अयोध्या दौ-याची बॅनरबाजी करून मनसेने सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. या बॅनरवर राज ठाकरे यांचा भगवाधारी फोटो असून ‘राज तिलक की करो तय्यारी, आ रहे हैं भगवाधारी’ असे लिहिण्यात आले आहे.

तसेच ‘चला अयोध्येला, आम्ही चाललोय, तुम्हीही चला’, असे मनसेकडून सांगण्यात आले आहे. आता शिवसेना याला कसे उत्तर देतेय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन ५ जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. पक्षाकडून १०-१२ रेल्वेंची मागणी करण्यात आली आहे. राज ठाकरेंसोबत हजारो मनसैनिक अयोध्येला जाणार आहेत.

पण, हा राजकीय दौरा असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली होती. निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरे दौरा करत असल्याची टीका करण्यात आली. शिवसैनिक आणि आदित्य ठाकरे देखील अयोध्या दौ-यावर जाणार आहेत. पण, आमचा राजकीय नाही तर, श्रद्धेपोटी दौरा असणार आहे, असे संजय राऊतांनी सांगितले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या