19.2 C
Latur
Wednesday, February 8, 2023
Homeमहाराष्ट्रआपण पुन्हा उभे राहू्!

आपण पुन्हा उभे राहू्!

- शरद पवार यांचा कोकणवासीयांना धीर

एकमत ऑनलाईन

रायगड: वृत्तसंस्था
निसर्ग चक्रीवादळामुळे तडाखा बसलेल्या कोकणातील काही भागांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवार दि़ ९ जून रोजी पाहणी करून कोकणवासियांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

हिंमत दाखवली, योग्य नियोजन केले आणि मदत मिळाली तर आपण पुन्हा उभे राहू शकतो, असे सांगत पवारांनी नुकसानग्रस्तांना धीर दिला. तसेच नुकसानग्रस्तांना उद्यापासून रॉकेल, तांदूळ आणि गव्हाचं वाटप करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कोकणच्या दोन दिवसीय दौºयावर असून मंगळवार दि़ ९ जून रोजी त्यांनी म्हसळा, माणगाव, दिवे आगर आणि श्रीवर्धन येथील निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

पडलेली घरे, प्रार्थना स्थळे, मशिदी, मंदिर, शेती, बागा आदींची पवारांनी पाहणी केली. पवारांनी स्थानिकांशी चर्चा करून त्यांच्या व्यथाही जाणून घेतल्या. स्थानिकांनी पवारांसमोर त्यांच्या अडचणी सांगितल्या. आमच्या घराची कौलं उडाली. पत्रे उडाली. पिण्याचे पाणी नाही, वीज नाही, शेती नेस्तनाबूत झाली. नारळाची झाडे पडली. घरांची पडझड झाली. घराची डागडुजी करायची तर पैसे नाहीत. बँका बंद आहेत. राष्ट्रीय बँकाही बंद आहेत. बँकेत जाण्यासाठी महाडला जावे लागते़ तिथपर्यंत जाण्यासाठीही पैसे नाहीत, अशी व्यथा स्थानिकांनी पवारांसमोर मांडली. यावेळी पवारांनी हिंमत दाखवली की आपण पुन्हा उभे राहू, असे सांगत स्थानिकांना धीर दिला.

कर्मचारी, अधिका-यांशी साधला संवाद

त्यानंतर पवारांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. करोनाच्या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांना धान्य वाटप करण्यात आलं होतं. निसर्ग वादळामुळे या सर्वांचे धान्य भिजून गेले आहे. त्या सर्वांसाठी नव्याने धान्य देता येऊ शकेल, नुकसानग्रस्त शेतकरÞ्यांना रोजगार हमी योजनेतील कामे देण्यात येतील. तसेच भात शेतीचे नुकसान झालेल्यांना लागेल ती मदत देऊ, असे सांगतानाच उद्यापासून नुकसानग्रस्तांना गहू, तांदूळ आणि रॉकेलचं वितरण करण्यात येणार आहे, असे पवार म्हणाले.
पवार बुधवार दि़ १० जून रोजी सकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीकडे रवाना होणार आहेत. बुधवारी दापोली, मंडणगड येथील नुकसानीची पाहणी करणार आहेतच शिवाय प्रत्यक्ष घटनास्थळी जात कोकणातील शेतकºयांना दिलासा देणार आहेत.ठाण्यातील ‘या’ पाच ठिकाणी करोनाचा सर्वाधिक विळखा

Read More  कोरोना काळात पार्ले-जी ने रचला विक्रम 

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या