27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeमहाराष्ट्रआयुर्मान पूर्ण झालेल्या एसटी बस हटवणार-परिवहनमंत्री अनिल परब

आयुर्मान पूर्ण झालेल्या एसटी बस हटवणार-परिवहनमंत्री अनिल परब

एकमत ऑनलाईन

मुंबई : आयुर्मान पूर्ण झालेल्या अ‍ॅल्युमिनियम बांधणीच्या एसटी गाड्या मुंबईसह राज्यात धावत आहेत. या गाड्यांचा अपघात झाल्यास प्रवाशांना गंभीर इजा होते. प्रसंगी प्राणही गमवावे लागतात. यामुळे प्रवाशांसाठी धोकादायक ठरणाºया या बस महामंडळातून काढून टाकणार असल्याची परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

गेल्या १५ दिवसांत झालेल्या दोन एसटी अपघातांमध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून २० प्रवासी जखमी झाले आहेत. उरण आगारातील मुंबईकडे येणाºया एसटीने गुरुवारी पहाटे पावणेसात वाजण्याच्या सुमारास सिमेंट टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिली. वाशी पुलावर झालेल्या या अपघातात महिला वाहक आणि चालकासह एकूण ७ प्रवासी जखमी झाले. तर, २६ नोव्हेंबर रोजी कलेढोण-मुंबई या एसटी बसच्या अपघातात एकाचा मृत्यू होऊन १३ प्रवासी जखमी झाले होते. अपघातग्रस्त दोन्ही गाड्यांचे आयुर्मान पूर्ण झाले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

बांधणीचे काम धीम्या गतीने
महामंडळाच्या ताफ्यात सध्या १७ हजारांहून अधिक एसटी बस आहेत. यापैकी सुमारे ४००० गाड्यांचे आयुर्मान पूर्ण झाले आहे. अ‍ॅल्युमिनियम बांधणीच्या गाड्यांऐवजी अपघातरोधक अशा एमएस बॉडीमध्ये बस बांधण्याचा निर्णय तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी २०१८ मध्ये घेतला होता. मात्र या बसच्या बांधणीचे कार्य अत्यंत धीम्या गतीने होत असल्याने राज्यातील प्रवाशांचा प्रवास हा अ‍ॅल्युमिनियम गाड्यातूनच सुरू असल्याची बाब स्पष्ट होत आहे. ‘एसटी अपघात रोखण्यासह अपघाताची नेमकी कारणे जाणून घेण्यासाठी सखोल चौकशी करण्यात येईल. एमएस बॉडीतील बांधणीच्या सद्यस्थितीसह आयुर्मान पूर्ण झालेल्या गाड्यांचा आढावा घेण्यात येईल’, असेही मंत्री परब यांनी सांगितले. अपघातग्रस्त एसटीचे पूर्ण झालेले किलोमीटर, एसटीचे आयुर्मान यांच्याबाबत महामंडळाच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक संजय सुपेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

चौकशी सुरूच
कलेढोण-मुंबई एसटी अपघातात एसटीचा पत्रा एका बाजूने पूर्णपणे फाटला होता. अपघातात प्रवाशाचा जीव गेला. शिवाय महामंडळाचेही नुकसान झाले. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत महामंडळाकडून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येते.

 

भारत-बांगलादेश रेल्वेसेवा ५५ वर्षांनी पुन्हा सुरू होणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या