20.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeमहाराष्ट्रतरल प्राणवायूची क्षमतेच्या ९५ टक्क्यांवर साठवण करावी

तरल प्राणवायूची क्षमतेच्या ९५ टक्क्यांवर साठवण करावी

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोविड संसर्गाच्या संभाव्य तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) अर्थात तरल वैद्यकीय प्राणवायू कमी पडू नये, यासाठी त्याची साठवणूक करून ठेवण्यासंबंधी राज्य शासनाने उत्पादकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सर्व एलएमओ उत्पादन करणा-या कंपनी आणि प्राणवायू पुनर्भरण करणा-यांनी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत आपल्या क्षमतेच्या ९५ टक्क्यांपर्यंत साठवणूक करावी आणि पुढील आदेश येईपर्यंत ऑक्सिजन साठ्यासंबंधी अटीचे पालन करावे.

प्रकल्पामध्ये एलएमओ उत्पादन पूर्ण क्षमतेने केले जात आहे, याकडे लक्ष द्यावे व शहानिशा करून घ्यावी, असे निर्देशही सर्व उत्पादकांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यांमध्ये सर्व एलएमओ उत्पादक साठवणूक (दोन्ही, सार्वजनिक आणि खासगी) करीत आहेत तसेच जास्तीत जास्त प्राणवायू साठवणूकीची पातळी टिकून राहील, याबाबत जिल्हाधिका-यांनी खात्री करून घ्यायची आहे. याबाबत शक्य तेवढ्या लवकर कार्यवाही करावी, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी वाढल्यास अ-वैद्यकीय ऑक्सिजनचा उपयोग योग्य पद्धतीने करावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रामध्ये कोविड -१९ ची दुसरी लाट एप्रिल ते जून २०२१ दरम्यान कायम होती आणि या काळात सात लाख प्रकरणात १८५० मेट्रिक टन ऑक्सिजनाचा उपयोग करण्यात आला. वास्तविकता हा सर्व वैद्यकीय प्राणवायू महाराष्ट्रामधील उत्पादकांकडूनच उपलब्ध होतो. कोविडची दुसरी लाट चालू असताना असे निदर्शनास आले की, अनेक उत्पादकांकडे ऑक्सिजनचा पुरेसा साठा नव्हता आणि मागणी पूर्ण करण्यात ते कमी पडत होते. या अनुभवाच्या आधारे संभाव्य तिस-या लाटेच्या तयारीचा भाग म्हणून पुरेसा मेडिकल ऑक्सिजन उपलब्ध व्हावा या दृष्टीने या उपाययोजना केल्या जात आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या