23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeऔरंगाबादसाथ जियेंगे, साथ मरेंगे.. ; पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही सोडले प्राण

साथ जियेंगे, साथ मरेंगे.. ; पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही सोडले प्राण

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर लगेच पतीने देखील प्राण सोडले असल्याचे समोर आहे. या दोन्ही वृद्ध पती- पत्नीच्या पार्थिवावर ब्राम्हणगावातील स्मशानभूमीत रविवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘साथ जियेंगे-साथ मरेंगे‘ याप्रमाणे दोघेही आयुष्यभर एकमेकांची साथ दिल्याचे हे एक उदाहरणच आहे.

जिजाबाई बिसनराव ढाकणे यांचे वय ७४ वर्षे इतके होत. तर पती बिसनराव दगडु ढाकणे यांचे वय ७८ वर्षे इतकं होत. पहिल्यांदा पत्नी जिजाबाई यांचा मृत्यू झाला. जिजाबाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू होती. यावेळी पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पती बिसनराव यांनी देखील प्राण सोडले.

सदर घटना औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील ब्राम्हणगांव येथे समोर आली आहे. या दोघा पती पत्नीच्या एकदम आणि अचानकपणे जाण्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिजाबाई यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू असताना लेगच पतीने देखील आपले प्राण सोडले असल्याचे समोर आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या