25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत २७ टक्के ओबीसींना तिकीट देणार : पवार

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत २७ टक्के ओबीसींना तिकीट देणार : पवार

एकमत ऑनलाईन

पुणे : इतर मागासवर्गाच्या आरक्षणाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यात निवडणुका लागल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसदेखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये २७ टक्के ओबीसी उमेदवारांना तिकीट देईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, मान्सून अंदमानपर्यंत आला असल्याने पाण्याबाबत फारशी काळजी करण्याची परिस्थिती नाही, असेही ते म्हणाले. यासोबतच पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. तसेच राज्यात भारनियमन नाही, निम्मे दिवस रात्री दहा तास वीजपुरवठा आणि निम्मे दिवस आठ तास वीज पुरवठा करण्यात येत आहे. पीक विमा योजनेचा बीड पॅटर्न राज्यात लागू करण्यास परवानगी देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोणीही हिंसेचा अवलंब करू नये
बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्या प्रकरणी पोलिस योग्य तो तपास करतील, कोणीही हिंसेचा अवलंब करू नये आणि कायदा हातात घेऊ नये, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या