24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeमहाराष्ट्रएक डोसनंतरही लोकल प्रवासास मिळणार मुभा!

एक डोसनंतरही लोकल प्रवासास मिळणार मुभा!

एकमत ऑनलाईन

जालना : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे आणि लसीकरणसुद्धा वेगाने सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव केल्याने राज्य सरकारने मंदिरे, मॉल्स, शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, लोकलमध्ये केवळ दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच परवानगी आहे. पण आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक मोठी दिलासादायक माहिती दिली. ती म्हणजे एक डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेन, मॉल्समध्ये प्रवेश मिळण्याचे संकेत आरोग्य मंत्र्यांनी दिले आहेत.

दसरा झाला आणि आता दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणावर लोकं गर्दी करतात, मंदिर उघडलेली आहेत. अनेक कार्यक्रमांना परवानगी दिलेली आहे आणि चित्रपटगृहेदेखील उघडणार…या सर्व पार्श्वभूमीवर कोरोनाबाधितांची संख्या वाढते का आणि त्याचे प्रमाण कसे आहे, याचा अभ्यास करून कोविड निर्बंधांतून सूट देण्याबाबत मुख्यमंत्री स्तरावर निर्णय होऊ शकतो. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर अधिक असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून दिवाळीनंतर कोरोना केसेस कमी राहिल्या तर कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्या व्यक्तीला टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार उघडलेल्या सर्व क्षेत्रातील उपक्रमामध्ये सहभागी होता येईल, अशी दिलासादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवासात आणि विशेष सुविधांशी संबंधित नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. आता १८ वर्षांखालील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थीसुद्धा मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करू शकणार आहेत. याआधी ज्यांचे लसीकरण झाले, त्यांनाच प्रवास करण्याची परवानगी होती. सध्या देशात फक्त १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोविड-१९ विरुद्ध लस दिली जात आहे. मुंबईत लवकरच शाळा आणि महाविद्यालये उघडणार असल्याने सरकारने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. यामध्ये विशेषत: ज्युनिअर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या