30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रआजपासून १५ दिवस संचारबंदी

आजपासून १५ दिवस संचारबंदी

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर कडक लॉकडाऊनची घोषणा केलीय. या लॉकडाऊनला मुख्यमंत्र्यांनी ब्रेक द चेन असं नाव दिलं आहे. त्यानुसार उद्या रात्री ८ वाजल्यापासून राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार राज्यात पुढील १५ दिवस कलम १४४ लागू राहणार आहे. त्यानुसार राज्यात संचारबंदीचे आदेश लागू असणार आहे. राज्यात वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र तरीही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने प्रदीर्घ लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

राज्यात आजच्या घडीला कोरोनाचे पाच लाखांहून अधिक ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या आठवड्याभरापासून रोज ५० हजारांच्या पटीत रुग्ण वाढतायेत. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था, उद्योग ठप्प होते हे लक्षात घेऊन राज्य सरकारने लॉकडाऊनऐवजी कठोर निर्बंध लागू केले. मात्र तरीही कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत नसल्याने वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.

कोरोनाविरोधातल्या युद्धाला पुन्हा एकदा सुरुवात झाला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आज राज्यात ६०,२१२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. कोरोना रोखण्यासाठी रोज सव्वा २ लाख कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. राज्यात सध्या १२०० मेट्रिक टन ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरण्यात येत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तुटवडा जाणवत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंजेक्शन तयार करण्यास खूप दिवस लागत आहेत. राज्यात होणाऱ्या तुटवड्यावर लवकरच मात करु असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

काय सुरू असेल?
– हॉस्पिटलं, डायग्नोस्टिक सेंटर्स, क्लिनिक्स, व्हॅक्सिनेशन, मेडिकल इन्शुरन्स ऑफिस, फार्मसी, फार्मसिटकल कंपन्या, हेल्थ सर्व्हिस, उत्पादन यंत्रणा आणि त्याची वाहतूक करणाऱ्या यंत्रणा.
– दवाखाने, विमा, औषधं, औषधी सेवा डिलर, लस उत्पादन कारखाने, लस वाहतूक वाहनं, वैद्यकीय कच्चा माल वाहतूक. जनावरांशी संबंधित- कृषीची जनावरं, पाळीव प्राणी, वेअरहाऊसिंग, पावसाळ्याची कामं करण्यासाठीचा कर्मचारी, रिझर्व्ह बँक, सेबी, ईकॉमर्स, अधिस्वीकृती धारक पत्रकार, पेट्रोल पंप, कार्गो सेवा, सुरक्षामंडळं सुरू राहतील.
– किराणा, दूध, भाजीपाला दुकानं सुरू राहतील. कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाऊस खुली असतील. विविध देशांचे दूतावास कार्यालयं सुरू राहतील.
– पावसाळ्याची कामं सुरू राहतील. रिझर्व्ह बँक आणि सेबीप्रमाणित कार्यालयं सुरू असतील. टेलिकॉम क्षेत्राशी संबंधित यंत्रणा तसंच मालवाहतूक, पाणीपुरवठा यंत्रणा सुरू राहतील.
– कृषीक्षेत्राशी निगडीत खतं, बियाणं, उपकरणं, दुरुस्ती सुरू राहील. आयात-निर्यात यंत्रणा. ईकॉमर्स यंत्रणा. डेटा सेंटर्स, क्लाऊड सर्व्हिसेस, आयटी यंत्रणा सुरू राहतील. सरकारी आणि खाजगी सुरक्षायंत्रणा.
– इलेक्ट्रिक आणि गॅस पुरवठा यंत्रणा. एटीएम, पोस्ट सेवा, बंदरं, परवानाधारक औषधं आणि फार्मा उत्पादनांची वाहतूक करणाऱी वाहनांना परवानगी.

कोरोनासाठी ५ हजार ४०० कोटी रुपयांची मदत
राज्य सरकार म्हणून अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना एक महिन्यासाठी प्रत्येकी ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ देणार आहोत. या योजनेमध्ये ७ कोटी नागरिकांचा समावेश आहे.

शिवभोजन थाळी मोफत देण्यात येणार
शिवभोजन थाळी काही कोटी लोकांनी याचा लाभ घेतला आहे. दहावरून पाचवर किंमत करण्यात आली होती. आता ही थाळी मोफत देणार आहोत.

कोव्हिडसाठी तात्काळ निधी उपलब्ध
सुविधा वाढवणे, व्हेटिंलेटर्स किंवा तत्सम सुविधांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी देणार असून, ३ हजार ३०० कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

अधिकृत फेरीवाल्यांना मदत
महाराष्ट्र राज्य इमारत कामगार कल्याण मंडळातील १२ लाख लाभार्थ्यांना १५०० रुपये अधिकृत ५ लाख फेरीवाल्यांना एका वेळेचे १५०० रुपये, तसेच आदिवासी १२ लाख कुटुंबाना प्रति कुटंब २ हजार रुपये देण्यात येतील, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना तात्काळ घरी पाठवा – राजेश टोपे यांचे आदेश

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या