22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम?

महाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम?

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येवर हे सर्व अवलंबून असेल. राज्यात चाचण्यांची संख्या वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत असून, प्रत्येकाने चाचणी करावी यासाठीही पुढाकार घेत आहोत. कोरोना रुग्णसंख्या किती आहे यावरच लॉकडाऊन उठवला जावा की वाढवला जावा हे अवलंबून असेल. आरोग्य आणि सुरक्षा आमची प्राथमिकता असणार आहे, यावरून महाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम असणार असल्याचे अस्पष्ट संकेत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले़

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. ठाकरे सरकारने १ जूनपर्यंत राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत. एकीकडे राज्य कोरोनाच्या संकटाला सामना देत असताना दुसरीकडे तौते चक्रीवादळाच्या निमित्ताने अजून एका संकटाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान पावसाळा तोंडावर आला असताना सरकारसमोरील आव्हाने वाढण्याची शक्यता असून, लॉकडाऊन वाढणार की उठवणार हे पाहावे लागेल. असे ठाकरे यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले की, लॉकडाऊन असला तरी राज्यात महत्वाची कार्यालये, निर्मिती उद्योग, आयात आणि निर्यात सुरु आहे. पण तुम्ही अनावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर कधी पडायला मिळेल असे विचारत असाल तर ते पूर्णपणे रुग्णसंख्येवर अवलंबून आहे.

तिस-या लाटेपूर्वी लसीकरण महत्वाचे
आम्ही राज्यासाठी जास्तीत जास्त लस मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. जागतिक स्तरावरही प्रयत्न सुरू आहेत. जर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येऊ शकणा-या तिस-या लाटेला रोखायचे असेल तर जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करुन त्यांना सुरक्षित करावे लागेल, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

जलद गतीने लसीकरण सुरू
महाराष्ट्रात सर्वात जलद गतीने लसीकरण होत आहे. आम्ही आतापर्यंत दोन कोटी लोकांचे लसीकरण केले आहे. लसीकरणासाठी सर्व गोष्टी व्यवस्थित जागेवर असून जास्तीत जास्त पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न आहेत. ग्रामीण भागात जास्त लोकसंख्या असणा-या ठिकाणी लसीकरण करण्याचे आव्हान सध्या आमच्यासमोर आहे, असे आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितले.

राज्यात आज ४८ हजारांहून अधिक कोरोनामुक्त; २६,६१६ नव्या रुग्णांची नोंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या