22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeमहाराष्ट्र१५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढला, राज्‍य सरकारकडून आदेश जारी

१५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढला, राज्‍य सरकारकडून आदेश जारी

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२९ (प्रतिनिधी) कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरली नसल्याने १ मे पर्यंत घातलेले निर्बंध १५ मे पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून याबाबतचे आदेश आज जारी करण्यात आले. राज्‍याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढलेल्या या आदेशात सध्या लागू असलेले निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

राज्‍यात कोरोना रूग्‍णांच्या संख्येने उच्चांक गाठला होता.रूग्‍णांच्या मृत्‍यूचे प्रमाणही वाढले होते.रूग्‍णसंख्या वाढल्‍याने बेडस,ऑक्‍सीजन,रेमडेसीवीर सारखी औषधे यांचा तुटवडा जाणवायला लागला होता.एका बाजूला सतत वाढत जाणारी रूग्‍णसंख्या आणि दुस-या बाजूला साधनसामुग्रीची कमतरता या कात्रीत सरकार सापडले होते. सरकारसमोर लॉकडाउनशिवाय पर्याय राहिला नव्हता.म्‍हणून २१ एप्रिल रोजी पहिल्‍यांदा निर्बंधांची घोषणा करण्यात आली १ मे पर्यंत हे निर्बंध लागू राहणार होते.

दरम्‍यानच्या काळात रूग्‍णसंख्येत काही प्रमाणात घट झाल्‍याचे दिसून आले असले तरी अजूनही स्थिती पुर्णतः नियंत्रणात आलेली नाही. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. रुग्णालयात बेडस,ऑक्‍सीजन,औषधे यांचा तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे बुधवारी झालेल्‍या राज्‍यमंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर विस्‍तृत चर्चा झाली तेव्हा बहुतांश मंत्रयांनी लॉकडाउन वाढवावा अशीच सूचना केली होती. आरोग्‍यमंत्री राजेश टोपे यांनी देखील किमान १५ दिवसांनी तरी हा लॉकडाउन वाढविण्यात येईल असे सूचित केले होते.

या पार्श्वभूमीवर राज्‍याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचे आदेश गुरूवारी काढले आहेत.राज्‍यातील लॉकडाउन आता १५ मे च्या सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहे.याआधी ब्रेक द चेन अंतर्गत जे नियम या निर्बंध काळात लागू करण्यात आले आहेत ते निर्बंध कायम असणार आहेत.

अभिजीत पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी; पंढरीत स्वखर्चाने पाटील यांनी उभारले थिएटरमध्येच कोविड हॉस्पिटल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या