24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवला

महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवला

एकमत ऑनलाईन

मुंबई : काल केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक 3 संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यामध्ये रात्रीच्या वेळी व्यक्तींच्या हालचालीवरील निर्बंध हटविले गेले आहेत. तसेच योग संस्था आणि जिम याना 5 ऑगस्ट 2020 पासून उघडण्यास परवानगी दिली आहे. केंद्राप्रमाणेच महाराष्ट्र सरकारने राज्यातील लॉक डाऊन 31 ऑगस्ट पर्यंत वाढवला आहे.

महाराष्ट्र सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत ऑगस्ट महिन्यात काही शिथिलता दिली आहे. मात्र, 31 ऑगस्टपर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम असणार आहे. राज्य सरकारच्या नवीन गाईडलाईनुसार मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्तराँ सुरु ठेवण्यास मात्र परवानगी नाही. पण होमडिलिव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट आपलं किचन सुरु ठेऊ शकतात. मात्र, राज्य सरकारच्या जून महिन्यातील आदेशाप्रमाणेच इतर सर्व नियम लागू असणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक आहेच.

दरम्यान, देशातील लॉकडाऊन हळू हळू कमी करण्यात येत आहे. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये अद्यापही कडक लॉकडाऊन सुरूच राहणार असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशांतर्गत वैयक्तिक प्रवासाला विनापरवाना परवानगी देण्यात आली आहे. तर, 5 ऑगस्टपासून जीम व योगासही परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच, वैयक्तिक प्रवासासाठी सरकारने नाइट कर्फ्यूही हटवला आहे. मात्र, चित्रपटगृहे, मनोरंजन सभागृह, शाळा, महाविद्यालये बंदच राहणार आहेत.

देशातील लॉकडाऊन हळू हळू कमी करण्यात येत आहे. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये अद्यापही कडक लॉकडाऊन सुरूच राहणार असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशांतर्गत वैयक्तिक प्रवासाला विनापरवाना परवानगी देण्यात आली आहे. तर, 5 ऑगस्टपासून जीम व योगासही परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच, वैयक्तिक प्रवासासाठी सरकारने नाइट कर्फ्यूही हटवला आहे. मात्र, चित्रपटगृहे, मनोरंजन सभागृह, शाळा, महाविद्यालये बंदच राहणार आहेत.

 

अत्यावश्यक सेवांबाबतची सर्व दुकाने

 • याआधी जारी केलेल्या नियमांनुसार अत्यावश्यक सेवेत नसणारी दुकाने सुरु राहतील.
 • दारूच्या दुकानांना ज्या प्रमाणे याआधी परवानगी होती तशीच ती सुरु राहतील. ही सर्व दुकाने 9 ते 7 यावेळेत सुरु राहतील.
 • 5 ऑगस्टपासून मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी असेल. थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स बंद असतील. मात्र फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्सची किचन्स सुरु राहतील, जिथून होम डिलिव्हरीच्या ऑर्डर पूर्ण केल्या जातील.
 • ऑनलाईन शॉपिंगसंदर्भातील गोष्टी सुरु राहतील.
 • सध्या खुले असलेले सर्व औद्योगिक युनिट्स कार्यरत राहतील.
 • सर्व बांधकाम साइट्स ज्यास सुरु ठेवण्याची परवानगी आहे त्या कार्यरत राहतील. तसेच परवानगी असलेली मान्सूनपूर्व सर्व कामे  सुरु राहतील.
 • ऑनलाईन/अंतर शिक्षण आणि संबंधित गोष्टी
 • सर्व शासकीय कार्यालये (आणीबाणी, आरोग्य आणि वैद्यकीय, ट्रेजरिज, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, एनआयसी, अन्न व नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायवायके, मनपा वगळता) 15 टक्के स्ट्रेन्थ किंवा 15 कर्मचारी या तत्वावर सुरु राहतील.
 • सर्व खाजगी कार्यालये 10 टक्के स्ट्रेन्थ किंवा 10 कर्मचारी या तत्वावर सुरु राहतील.
 • स्वयंरोजगार असलेल्या लोकांशी संबंधित गोष्टी, जसे की प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट-कंट्रोल आणि तंत्रज्ञ यांना काम करण्यास परवानगी असेल.
 • आऊटडोअर खेळ ज्यामध्ये संघाची गरज नाही असे गोल्फ, फायरिंग रेंज, व्यायामशाळा , टेनिस, बॅडमिंटन आणि मल्लखंब यांना 5 ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे.
 • टॅक्सी, कॅबमध्ये 1+3, रिक्षामध्ये 1+2, चारचाकीमध्ये 1+3 परवानगी देण्यात आली आहे. मात्र प्रवाशांना मास्क अनिवार्य आहे. (हेही वाचा: केंद्र सरकारने जाहीर केली अनलॉक 3 ची मार्गदर्शक तत्त्वे; देशात 5 ऑगस्ट पासून सुरु होणार जिम, सिनेमा हॉलवरील बंदी कायम, जाणून घ्या सविस्तर)

या प्रकारे महाराष्ट्रामध्ये ‘मिशन बिगीन अगेन’द्वारे काही गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे.

Read More  कोविड-१९ प्रादुर्भाव काळात डॉक्टरांवर हल्ला होणे हे गंभीर बाब

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या