22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात १ जूनपर्यंत लॉकडाऊन कायम

महाराष्ट्रात १ जूनपर्यंत लॉकडाऊन कायम

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे टळले नसल्याने ठाकरे सरकारने गुरुवार दि़ १३ मे रोजी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला असून, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी मुख्यमंत्री निर्णय घेत अधिकृत जाहीर करतील अशी माहिती दिली होती. त्याप्रमाणे १ जूनपर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याचा अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानेच सध्या लागू असलेले कठोर निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

राज्यातील कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्यात १४ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आधी हे निर्बंध १ मेपर्यंत होते व नंतर १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत शनिवारी संपत असल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. या निर्बंधामुळे राज्यात कोरोनाची साथ नियंत्रणात आली असून राज्याचा रुग्णवाढीचा दर कमी झाला आहे. १० ते १५ जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी झाला असला तरी आजूनही काही जिल्हयात बाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सध्याचे निर्बध आणखी १५ दिवस वाढविण्याची एकमुखी मागणी बहुतांश मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. त्यानुसार लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

औषधे आणि कोरोनाशी संबंधित सामग्रीसाठी प्रवास करावा लागणा-या विमानतळ आणि बंदरावरील कर्मचा-यांना लोकल, मोनो आणि मेट्रोने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. एखाद्या ठिकाणी निर्बंध वाढवायचे असल्यास स्थानिक प्रशासनाकडे हक्क देण्यात आले असून यासाठी निर्बंध लागू करण्याच्या ४८ तास आधी नोटीस द्यावी असे सागंण्यात आले आहे.

वाहतुकीसाठी चालक, क्लिनर दोघांनाच परवानगी
कार्गो कॅरिअरमध्ये चालक आणि क्लिनर अशी दोघांनाच परवानगी असणार आहे. जर हे कार्गो कॅरिअर बाहेरच्या राज्यातून प्रवेश करत असतील तर निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट बंधनकारक असून, ४८ तासांच्या आत तो काढलेला असावा.

स्थानिक प्रशासनाला निर्बंध कमी-जास्त करण्याचे अधिकार
स्थानिक बाजारपेठा तसेच, एपीएमसीवर पालिकांनी लक्ष ठेवून कोरोनाच्या नियमांचे पालन होत आहे की नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी असेल. जर एखाद्या ठिकाणी नियमांचे पालन होत नसेल किंवा परिस्थिती हाताळणे शक्य होत नसेल तर स्थानिक प्रशासन तिथे निर्बंध वाढवण्याचा किंवा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते.

बाहेरून येणा-यास ४८ तास आधी आरटीपीसीआर टेस्ट आवश्यक
ठाकरे सरकारने निर्बंध अजून कठोर केले असून, बाहेरुन राज्यात येणा-या लोकांना आरटीपीआसीरआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारे प्रवेश करणा-या व्यक्तीकडे निगेटिव्ह आरटीपीआसीरआर टेस्ट रिपोर्ट असे बंधनकारक असून प्रवेश करण्याच्या ४८ तास आधी हा रिपोर्ट काढलेला असावा असे आदेशात नमूद आहे. दरम्यान देशातील कोणत्याही भागातून राज्यात येणा-यांसाठी आधीचे नियम लागू असतील.

लोकसंख्येत २०२७ पूर्वीच भारत चीनला मागे टाकणार; संयुक्त राष्ट्राचा अहवाल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या