30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात लॉकडाऊन अटळ?

राज्यात लॉकडाऊन अटळ?

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील स्थिती गंभीर बनली आहे. अशा परिस्थितीत कडक निर्बंध आणि थोडी सूट असे जमणार नाही. आतापर्यंत बेपर्वातून ही परिस्थिती ओढवली. त्यामुळे आता किमान आठवडाभर तरी कडक लॉकडाऊन लावावाच लागेल. तसे तर १५ दिवस लॉकडाऊनचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनशिवाय पर्याय उरलेला नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन लावण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यासंदर्भात दोन दिवसांत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला सर्वपक्षीय सहमती मिळाल्याचे समजते.

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आड राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांतदादा पाटील आदींनी सहभाग घेऊन आपल्या सूचना मांडल्या.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना विषाणूची साखळी तोडायची असेल, तर लॉकडाऊन लावण्याचा विचार करावा लागेल. आपण जनतेला समजावू शकतो पण कोरोनाला समजावू शकत नाही, असे म्हटले. थोडा वेळ सर्वांना कळ सोसावी लागेल. कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आज टास्क फोर्ससोबत बैठक
सर्वपक्षीय बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोविड टास्क फोर्सची बैठक घेणार आहेत. या बैठकीत राज्यातील कोविड स्थितीचा सर्वंकष आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर टास्क फोर्सच्या शिफारशीनुसार पुढील पावले टाकली जाणार आहेत. राज्यातील स्थिती पाहता ८ ते १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला जाण्याची दाट शक्यता आहे. तसे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

… तर रुग्णसंख्या १० लाखांवर : वडेट्टीवार
मदत आणि पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपण आता उपाययोजना केली नाही तर रुग्णसंख्या १० लाखांवर जाईल. ती झाली तर आपण काय करणार… त्यामुळे आज निर्णय घेऊन ही चेन तोडणे गरजेचे आह, असे म्हटले.

अचानक लॉकडाऊन नको : चव्हाण
सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी लॉकडाऊनबाबत मध्यम मार्ग काढण्याची सूचना केली. अचानकपणे लॉकडाऊन न लावता लोकांना दोन तीन दिवस आधी त्याबाबत कल्पना द्यावी, असेही ते म्हणाले.

विरोधकांच्या सूचनांचा विचार करू
विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल. विशेषत: रेमडीसिवीर उपलब्धता, चाचण्यांचे रिपोर्ट्स लवकर मिळणे, प्रयोगशाळांना सूचना देणे, ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन अशा त्यांच्या सूचनांवर शासन कार्यवाही करेल. पण सोबत रुग्णवाढ थांबवण्यावरील विचारही महत्त्वाचा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

हृदयविकार, कॅन्सरची लक्षणे असणाऱ्या रुग्णाचे मृत्यू अधिक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या