32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeमहाराष्ट्रलॉकडाउनमुळे राज्‍याची अर्थव्यवस्‍था मंदावली, महसुलात मोठी घट - राज्‍यपाल कोश्यारी

लॉकडाउनमुळे राज्‍याची अर्थव्यवस्‍था मंदावली, महसुलात मोठी घट – राज्‍यपाल कोश्यारी

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१ (प्रतिनिधी) लॉकडाउनमुळे राज्‍याची अर्थव्यवस्‍था मंदावली असून अपेक्षित महसुलात मोठी घट झाली आहे. कोरोनाचे संकट असताना त्यात नैसर्गिक आपत्‍तींचीही भर पडली. मात्र कोरोनाचे नियंत्रण करण्यासाठी राज्‍यसरकारने केलेल्‍या उपाययोजना या उर्वरित राज्‍यांसाठी आणि अन्य देशांसाठीही आदर्श ठरल्‍या असून महाविकास आघाडी सरकारने कोरोना साथीचे अत्‍यंत प्रभावी व्यवस्‍थापन केल्‍याची प्रशंसा राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधिमंडळासमोरील अभिभाषणात केली. केंद्र सरकारकडून राज्‍याच्या हिश्श्याची जीएसटीची २९ हजार २९० कोटी रूपयांची थकबाकी अदयापही येणे असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. राज्यपाल कोश्यारी यांनी संपूर्ण भाषण मराठीत केले.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरवात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने झाली. सुमारे तीस मिनिटे संपूर्णपणे मराठीमध्ये केलेल्या अभिभाषणाच्या सुरवातीलाच महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाबाबत सर्वोच्य न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडण्यात येत असल्याचे सांगितले. सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी माझे सरकार कटीबध्द असल्याची ग्वाही राज्यपालांनी यावेळी दिली. लॉकडाउनमुळे राज्‍याची अर्थव्यवस्‍था मंदावली असून अपेक्षित महसुलात मोठी घट झाली असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. मागील वर्ष अर्थसंकल्प सादर करताना ३ लाख ४७ हजार ४५६ कोटी रुपये महसुली उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात राज्‍याकडे जानेवारी २०२१ च्या अखेरीस केवळ १ लाख ८८ हजार ५४२ कोटी रूपये इतकाच महसूल जमा झाला असल्‍याची माहिती राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली.

शेतकरी कर्जमुक्ती यशस्वी
आर्थिक अडचणीत असतानाही राज्य सरकारने ३० लाख ८५ हजार शेतक-यांच्या ११ हजार ६८४ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना यशस्वी केली. या अडचणीच्या वर्षात शेतक-यांना ७ हजार कोटी रुपयांची रक्कम दिल्याचा राज्यपालांनी आवर्जुन उल्लेख केला.

दुसऱ्या लाटेचा शक्यता, काळजी आवश्यक
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता असल्‍याने सुरक्षित अंतर पालन,मास्‍क लावणे,हात धुणे याची आवश्यकता आहे.कोविड-१९ च्या लसीकरणाचीही सुरूवात करण्यात आली आहे.राज्‍यातील लोकांसाठी लसींचा पुरवठा वाढावा यासाठी राज्‍य केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहे असेही राज्‍यपाल म्‍हणाले.

औदयोगिक मंदीतही १ लाख कोटींची गुंतवणूक
औदयोगिक मंदी असूनही महाराष्‍ट्राने १ लाख कोटी रूपयांपेक्षा अधिकची देशांतर्गत व थेट विदेशी गुंतवणूक आकर्षित केली आहे.विविध उदयोग सुरू करण्यासाठी टाळेबंदीच्या काळात ६६ ऑनलाईन परवानग्‍या दिल्‍या आहेत असेही राज्‍यपाल म्‍हणाले.

आयसीएसई दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या