23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeमहाराष्ट्रपुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा

पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : कोल्हापूरची पंचगंगा नदी धोका पातळीवरून वाहत असल्याने पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग तीन दिवस बंद आहे. परिणामी शेकडो वाहने मार्गाच्या दोन्ही दिशेला अडकून पडली आहेत. या पार्श्वभूमीवर आता महामार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने रविवारी चाचपणी करण्यात आली. मात्र सध्या तरी महामार्ग सुरू होण्याची कोणतीही चिन्हे नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

महापुरामुळे येथील पंचगंगा नदीवरील पुलावर पाणी आले आहे. मुंबई-पुण्याहून बंगळूरूकडे जाणारी वाहने अडकलेली आहेत, तर दूधगंगा नदीलाही महापूर आल्याने कर्नाटक, दक्षिण भारतातून पुणे-मुंबईकडे जाणारी वाहनेदेखील जागीच थांबली आहेत. दोन्ही बाजूस वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत. नाशवंत माल, औषधे, धान्य, भाजी-पाला आदी अत्यावश्यक सेवेतील माल काही वाहनांमध्ये असून त्याची जिल्ह्यास तातडीने आवश्यकता आहे. राष्ट्रीय महामार्गावर आज ६ फूट पाणी होते. त्यामुळे वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजूनही धोका संपलेला नाही. पंचगंगा पुलाच्या ‘बेअरिंग सॉकेट’पासून पाणी उतरत नाही, तोपर्यंत वाहतूक सुरू करू नये, असे आदेश आहेत.

धवन सेनेची ट्वेंटी-२० तही विजयी सलामी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या