24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रहातकणंगले तालुक्यात लम्पीने सहा गायी दगावल्या

हातकणंगले तालुक्यात लम्पीने सहा गायी दगावल्या

एकमत ऑनलाईन

इचलकरंजी : हातकणंगले तालुक्यातील सहा गायींचा लम्पीने मृत्यू झाला आहे. लसीकरण युद्धपातळीवर सुरू असले तरी मोकाट जनावरांच्या लसीकरणाचा प्रश्न कायम आहे. शिरोळ तालुक्यात कुटवाड येथे एका गायीचा मृत्यू झाला. त्यामुळे बळिराजा धास्तावला आहे. शेतक­-याचे पशुधन धोक्यात आले आहे.

हातकणंगले तालुक्यात ३२ हजार पशुधन आहे. इचलकरंजी शहरात ४० गायींना लम्पी आजाराची लागण झाली आहे. ५ गायींचा मृत्यू झाला आहे. शहरातील १ हजार २०० गायींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जनावरांच्या मृत्यूने शेतक-­यांची चिंता वाढली आहे.

कुटवाड (ता. शिरोळ) येथे एका गायीचा लम्पी आजाराने बळी घेतला आहे. दरम्यान, तहसीलदार डॉ. अपर्णा धुमाळ-मोरे यांनी गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सागर कुरुंदवाडे यांची तत्काळ बैठक घेऊन लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या कामात हयगय करू नका. दोन दिवसांत लसीकरण पूर्ण करा, असा आदेश दिला आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात लम्पी आजाराने एकाही जनावराचा मृत्यू झाला नसल्याचा दावा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पठाण यांनी केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या