23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रमॅग्नेटिक महाराष्ट्र : राज्यशासनाचे ३४ हजार ८५०कोटींचे सामंजस्य करार !

मॅग्नेटिक महाराष्ट्र : राज्यशासनाचे ३४ हजार ८५०कोटींचे सामंजस्य करार !

राज्यात एक लाख कोटी गुंतवणूकीचे लक्ष्य ! ⁃ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि.२ (प्रतिनिधी) लॉकडाऊनमुळे ठप्प झालेले अर्थचक्र आता गती पकडत असून, मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत आज १५ कंपन्यांनी जवळपास ३४,८५० कोटींच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार केले. यामुळे सुमारे २३ हजार १८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार असून, राज्यात एक लाख कोटी रूपयांची गुंतवणूकीचे लक्ष्य पुर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार ,एफडीआय शेरपा प्रधान सचिव भूषण गगराणी उद्योग प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. पी.अनबलगन, आणि गुंतवणूकदार उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, कोरोनासारख्या संकट काळातही उद्योग विभागाने उद्योजकांचा विश्वास कायम ठेवल्याबद्दल प्रशंसा केली. गुंतवणूकदार आणि राज्य शासन यांचा एकमेकांवर विश्वास आहे मागील सामंजस्य करारातील अनेक प्रक्रिया पुर्ण झाल्या आहेत. सुमारे ६० टक्के उद्योगांच्या बाबतीत जमिन अधिग्रहणासारख्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत ही निश्चितच समाधानाची बाब आहे. आज झालेले सामंजस्य करार ही केवळ सुरूवात आहे. सुमारे ३५ हजार कोटींची गुंतवणूक आज होते आहे ही महत्वाची गोष्ट आहे. लवकरच एक लाख कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दीष्ट आहे. महाराष्ट्र या कोरोना परिस्थितीत नुसते बाहेर नाही पडणार तर अधिक सामर्थ्याने देशात आघाडी घेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

विविध विकारांवर उपयोगी कलौंजी

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या