कोल्हापूर : राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांनी रस्त्यावरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना चरणस्पर्श केला. पुण्याहून कोल्हापूरकडे जात असताना कराडमध्ये शेट्टी-महाडिकांची गाठ पडली.
यावेळी शेट्टींना पाहून महाडिकांनी कडकडून गळाभेट घेतली. त्यांना चरणस्पर्श करुन त्यांचे आशीर्वादही घेतले. गेल्या पाच-सहा वर्षात महाडिकांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या पराभवावर महाडिकांनी विजयाचा झेंडा रोवला.